युवकांनी स्वतःसह समाजाच्या विकासासाठी एकत्र यावे – डॉ. उल्हास तेंडुलकर

0

मुंबई :- स्वतःसह समाजाचा विकास कसा साधता येईल यावर प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी समाजातील सर्व शिक्षितांनी एकत्र यावे, बदलत्या काळानुसार समाजात शिक्षण, व्यवसाय आणि महिलांच्या वैवाहिक जिवनात कशा प्रकारे बदल घडू शकतात आदी मुद्द्यांवर युवकांच्या कार्यक्रमात गटनिहाय चर्चा करण्यात यावी. या चर्चेतून समाजाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कसे अधिक भक्कम करता येईल, समाज विकासाचे चांगले नियोजन व्हावे आणि ते कृतीत उतरणे गरजेचे आहे. समाजाकडून काय अपेक्षा आहेत, त्यात काळानुरुप कोणते बदल करण्याची गरज आहे. यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे.समाजाच्या विकासासाठी व्हीजन तयार करणे हे मोठे काम आहे. त्याला कायमच पाठिंबा आहे.मला वैयक्तिकदृष्ट्या सामाजिक कामात आनंद मिळतो, हे काम आव्हानात्मक आहे व त्याची गरज आहे म्हणून समाधान लाभते, वयाचा विचार न करता सकारात्मक पद्धतीने मी सतत कार्यरत राहतो असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ उल्हास तेंडुलकर यांनी केले. कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राम्हण युवक मंडळ यांच्या १७ व्या वर्धापनदिनी डॉ तेंडुलकर यांना समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक रत्नाकर तेंडोळकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.ते आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की, जन्म आणि मृत्य यामधील कालखंडास मी जगणं संबोधतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा जगण्याचा कालावधी येतो मात्र ते जगणं तेव्हाच पूर्ण होऊ शकत जेव्हा या प्रवासात कुठेतरी सामाजिक कामात आपले योगदान असेल. सामाजिक काम एखाद्या सरळ सोप्या व्याख्येत बांधता येणार नाही मात्र समाजातील वंचित, दुर्लक्षित समाजघटकांसाठी आपण केलेली एखादी कृती त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते एक सामाजिक काम म्हणता येईल.या कार्यक्रमात मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांना संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा पत्रकारितेचा ‘जागृती २०२४’ या पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वधू-वर मेळाव्यास शेकडो तरुण-तरुणी उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीचा आढावा संस्थेचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी प्रास्ताविकात घेतला. तर अरुण नाईक, अनिकेत वालावलकर, मनोज सामंत, रुपल सामंत, संदेश देसाई, ऋषिकेश सामंत, शैलेश आजगावकर, अमित आडेलकर, विल्पव अवसरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here