विरोधात बोललं की ईडीचा धाक दाखवला जातोय, पण छत्रपतींचे मावळे बनायचं असेल तर प्रतापकाका लढणं कधी सोडूनका – खा.अमोल कोल्हे

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) आज संपूर्ण देशभर विकासाच्या आणि धर्माच्या नावाखाली अराजकता माजली आहे. देशाची वाटचाल ही हुकुमशाही कडे सुरू आहे. विरोधात कोणी बोललं की ईडीचा धाक दाखवला जातोय पण छत्रपतींचे मावळे बनायचं असेल तर प्रतापकाका लढणं कधी सोडू नका असे आवाहन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माधवराव निर्हाळी खुले नाट्यगृहात युवा महासंवाद अभियानाचा समारोप करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव ढाकणे हे होते.प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रतापराव ढाकणे यांनी या युवा अभियानाच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण चाळीस महाविद्यालयातील युवकांशी महासंवाद साधुन युवा वर्गाच्या अडीअडचणी समजून घेतल्याचे सांगितले.यावेळी “भविष्याची वाटचाल” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.खासदार कोल्हे यांनी संसदेच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या प्रश्नावर सुप्रियाताई सुळे आणि मी आवाज उठविला तर आमचं निलंबन करण्यात आले.विरोधी पक्षाचे खासदार बोलायला लागले तर त्यांना ट्रोल केले जाते.देशात लोकशाही आहे की नाही हेच यातून स्पष्ट होते. संसदेच्या सभागृहात नंदीबैलासारखे माना डोलवनारे निवडून देण्यापेक्षा वाघा सारखे सर्व सामान्याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की या तालुक्यात आले की ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर लढणारे स्व.गोपिनाथ मुंढे आणि पाथर्डी तालुक्यात विज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके भिरकावनारे स्व.बबनराव ढाकणे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता मात्र तुमच्याच मनामध्ये असनारे प्रतापकाका ढाकणे हे आमदार झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आता सर्वत्र फक्त झेंड्याची भाषा वापरली जात असुन सर्व सामान्य माणसाला नागविले जात आहे असा आरोप त्यांनी केला.प्रारंभी शिवशाहीर कल्याण काळे यांनी भगवान बाबा यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांना जनार्दन बोडखे,हमिद सय्यद यांनी साथसंगत केली.वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रभावतीताई ढाकणे, रत्नमाला उदमले,ज्योती जेधे, माधवराव काटे, सिताराम बोरुडे, ज्ञानदेव केळगंद्रे,बंडूशेट बोरुडे, उद्धव दुसंग, गहिनीनाथ शिरसाठ, राजेंद्र खेडकर, अॅडहोकेट अमोल पालवे, भगवान दराडे, विष्णू ढाकणे, दिगंबर गाडे, बाळासाहेब ढाकणे, वैभव दहिफळे,दिलिप राजळे सर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.आभार माधवराव काटे यांनी मानले.अपर्णा शेळगावकर, आणि गणेश सरोदे यांनी सुत्र संचालन केले.पाथर्डी शहरातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात हेलिकॉप्टरने खा.कोल्हे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here