नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

0

नाशिक : 183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि पत्रकार कैलासवासी माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम खासदार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वामी समर्थ सेवा केंद्राचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि राज्याचे वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी वाचनालयाने विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पुरस्कारातील अभिनंदन करून भविष्यातही त्यांच्या हातून उत्तम समाज कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमा दरम्यान सन्मानपत्र सन्मानचिन्ह ५० हजार रुपयांचा धनादेश शाल पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप देण्यात आले या वेळी दोन्ही मान्यवरांनी नम्रपणे पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराच्या रकमेत आपल्याकडून तेवढ्याच रकमेची भर घालून हा निधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी संस्थेकडे सुपूर्द केला.यावेळी बोलताना डॉ भारती पवार म्हणाल्या की सार्वजनिक वाचनालय या राज्यातील सर्वात जुन्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार विशेष गौरवाचा आहे पुरस्कार मिळाला की अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते पुस्तकांचे वाचन करण्याचे वेगळे महत्त्व आहे आजच्या पिढीने वाचन करणे गरजेचे आहे वाचन संस्कृतीसाठी सार्वजनिक वाचनालयाने विविध उपक्रम चालू केले आहेत सार्वजनिक वाचनालयाला सी एस आर फंडाच्या माध्यमातून आपण मदत करू वाचनालयाने विद्यार्थिनींसाठी खास अभ्यासिकेची निर्मिती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला आमदार राहुल ढिकले, सिमाताई हिरे, दिलीप फडके,वैद्य विक्रांत जाधव,सुनील कुटे, अभिजीत बगदे,देवदत्त जोशी,जयेश बर्वे,गिरीश नातू,जयप्रकाश जातेगावकर,संजय करंजकर,सुरेश गायधनी,प्रेरणा बेळे,शोभाताई नेर्लीकर,प्रशांत जाधव,धर्माजी बोडके,सोमनाथ मुठाळ,मंगेश मालपाठक,प्रशांत जुन्नरे,दीपक खैरनार,विकास देशमुख, रमेश थोरात, हेमंत रावले,यतीन पवार सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here