ढाकणेंच्या पाथर्डीतील बचत गटाच्या आनंद मेळाव्यात‌‌ अभिनेत्री अनिता दाते यांची”माझ्या नवऱ्याची बायको मालीकेची स्टोरी “ऐकून सर्व महीला भारावल्या !

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ) मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील संस्कार भवनात माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.प्रभावती प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आनंद मेळावा आयोजित केला होता.त्या मेळाव्यात मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अनिता दाते यांनी “माझ्या नवऱ्याची बायको”या टीव्ही मालिकेची स्टोरी सांगितली.ती स्टोरी ऐकून पाथर्डीतील सर्व महीला भाराउन गेल्या. त्यांनी सांगितले की एक महिला आपल्या नवऱ्याच्या खिशातून रोज शंभर रुपये चोरून एका वेगळ्या डब्यात ठेउन बचत करते.तीच महीला चांगला संसार करण्यासाठी हातभार लावते.महीलांच्या अंगात चिकाटी असते.नवऱ्यासोबत भांडण झाले तरी ती नवऱ्याला कशी जीव लावते हे या मालिकेतील स्टोरीत सांगितले आहे.या आनंद मेळाव्यात पाथर्डी तालुक्यातील हिरकणी ग्रुपच्या बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.या दोन दिवसीय मेळाव्यात खाद्य पदार्थ, साहित्य, प्रदर्शन भरवून बचत गटातील महिलांनी बनवलेल्या मालाची चांगली विक्री झाली .त्याला चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.यावेळी बचतगटातील सर्व महिलांना सन्मानित करुन सौ. प्रभावती ढाकणे यांनी हळदी कुंकू देत संक्रांतीच्या मुहूर्तावर वाण वाटले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.योगिता राजळे, सौ.भापकर,सौ.उदमले,सौ.निर्हाळी, बचतगटातील महिला आघाडीच्या भारती असलकर, यांच्या सह पंचक्रोशीतील हजारो महिला उपस्थित होत्या.प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here