प्लास्टिक सर्जरी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

0

नाशिक : भारतीय जैन संघटना नाशिक द्वारा आयोजित श्री रसिकलाल धारिवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.या शिबिरात भाजल्यामुळे झालेल्या जखमा, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे किंवा शरीराचे व्यंग, वाकडी बोटे, मस, चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, दुभंगलेले ओठ, वाकडे नाक आदी गोष्टींवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.खरंतर प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. त्यासाठी होणारा लाखोंचा खर्च न झेपणारा असतो लाखो रुपये खर्च येणारी प्लास्टिक सर्जरी सारखी शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून अल्प दरात करण्यात येणार असून या शिबीराचा सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी लाभदायी ठरणार आहे त्यामुळे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ भारती पवार यांनी केले.यावेळी नंदकिशोर साखला, नंदलालजी पारख, सतीशजी लुंकड,मोहनलाल चोपडा,डॉ राजेंद्र मंडलेचा, दीपक चोपडा, सोनलाल भंडारी, अभय जैन, विनय कर्नावट,डॉ किरणमलजी धाड़ीवाल,लालाभाऊ जैन, ललितकुमार सुराणा, रोशन टाटिया, मनीषा शाह, प्रशांत छाजेड,रोहित बंब, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here