राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत घडवण्याच्या दिशेने तरुणांमध्ये नवा उत्साह आणि नवी ऊर्जा निर्माण करेल :- डॉ भारती पवार

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव द्वारा आयोजित लोकनृत्याचे दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.डॉ भारती पवार यांनी यावेळी सांगितले की राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोख्याची भावना, बंधुता, धैर्य आणि शौर्य या संकल्पनेचा प्रसार आणि त्यांच्या सांस्कृतिचे सामूहिक व्यासपीठावर प्रदर्शन करणे हा या युवा महोत्सवाचा उद्देश आहे.देशातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे, हा अमृतकाळ आहे. आज तुम्हाला इतिहास घडवण्याची, इतिहासात तुमचे नाव नोंदवण्याची संधी आहे भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात तुम्ही तुमचे नाव सुवर्ण अक्षरात लिहू शकता, म्हणूनच मी तुम्हाला 21 व्या शतकातील भारताची सर्वात भाग्यवान पिढी समजते. यावेळी त्रिपुरा येथील कलाकारांनी लोकनृत्य सादर केलेया कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी पुलकीत सिंग, नूडल ऑफिसर दिल्ली परमाजित सिंग,सहायक संचालक पंजाब दुब्रा डोबरा,जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील,कला शिक्षक सह विविध राज्यांतून आलेले युवा स्पर्धक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here