नाशिक : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये लाभार्थ्यांशी दूरदृष प्रणाली द्वारे संपर्क साधला यावेळी ओझर येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित संपन्न झाला.ओझर येथील कार्यक्रमांमध्ये संवाद साधताना केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या की 2047 ला विकसित भारत करण्यासाठी आतापासून काम करावे लागेल प्रत्येक योजना प्रत्येक गावात शहरात पोहोचल्या तर विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल 15 नोव्हेंबर पासून आतापर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा ११ कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे तसेच १ कोटी लोकांना आयुष्यात भारत च्या माध्यमातून लाभ मिळाला आहे देशाला विकसित करण्याच्या या संकल्प यात्रेमध्ये सर्वांचा सहभाग असल्याचे सांगून डॉक्टर भारती पवार यांनी विविध योजनांबाबत सविस्तर माहिती घेऊन आढावा घेतला तसेच ओझर येथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले.यावेळी शंकरराव वाघ,यतीन कदम,सतीश मोरे, नितीन जाधव, भागवत बाबा बोरस्ते, दिलीप मंडलिक,राजेंद्र सोनवणे,योगेश चौधरी, प्रशांत गोसावी,जगदीश उगले, रतन बांडे, किशोर कदम, विकास पांडे, रेखा अहिरराव, सारिका डेर्ले,समाधान थेटे, अरबाज पठाण, नितीन बागुल,विष्णू ढोमसे,आनंद शिंदे, किरण पवार,सुनील मोरे,रऊफ़ पटेल, प्रशांत पगार, शर्मिलाताई कदम, संजय गाजरे,प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, BDO महेश पाटील, ओझर CEO किरण देशमुख, निफाड CEO अमोल चौधरी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Home Breaking News विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यां पर्यंत पोहचवणे...