नांदगाव पाणी योजना स्वागत महोत्सवाची उत्साहात सुरुवात विशेष सन्मान पुरस्कार देत महिलांना केले सन्मानित

0

नांदगाव : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून गिरणा धरण ते नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाले असून या योजनेचे काम लवकरच सुरू होत आहे आणि हा नांदगावकर माता-भगिनींसाठी अतिशय आनंदाचा असा क्षण आहे आणि म्हणूनच हा उत्सव नांदगाव शहरात साजरा करण्यात येत आहे.पंधरा पंधरा दिवसाने पाणी येण्याची परिस्थिती या पाणी योजनेमुळे आता बदलणार असून नियमित आणि शुद्ध पाणी सर्व नांदगावकरांना प्यायला मिळणार असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी माता-भगिनींकरिता होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सावता महाराज कंपाऊंड परिसरातील सर्व महिलांकरिता या कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले.या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी लवकरच या योजनेचे भूमिपूजन होणार असल्याची आनंदाची बातमी उपस्थित महिलांना दिली तर नगराध्यक्ष राजेशजी कवडे यांनी पाणी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे कल्पनेतून या पाणी योजनेचे नियोजन दर्जेदार चीत्रितीच्या माध्यमातून स्क्रीन वर दाखवण्यात आले.मोठ्या संख्येने या कार्यक्रमास महिलांनी भाग घेऊन आनंद साजरा केला, विविध प्रकारचे खेळ विनोद डान्स गाणी यावेळी सादर करण्यात आली.सदर परिसरातील 13 महिलांना आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तसेच गॅस शेगडी यावेळेस पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात आली. यात डॉ. शितल अत्रे, सौ. प्रतिभा खैरनार, श्रीमती मंगला अंबादास गुरव,, श्रीमती शकुंतलाताई रामराव कवडे, श्रीमती अन्नपूर्णा नरेंद्र जोशी, डॉ. योगिनी गणेश चव्हाण, सौ. मीना भरत कासलीवाल, सौ.भारती गोटू कलंत्री, श्रीमती कच्याबाई यशवंत पवार, सौ. विजया आहेर धनवट सौ. मनीषा पाटील, सौ.श्वेता आनंद चोपडा, सौ. तारा गणेश शर्मा या महिलांना सन्मानित करण्यात आले.सोबतच 11 महिलांना पैठणी भेट देण्यात आली, 15 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.या वेळी होम मिनिस्टर खेळात प्रथम पारितोषिक फ्रिज, द्वितीय एल ए डी टिव्ही, तृतीय मिक्सर, चतुर्थ किचन सेट, व उत्तेजनार्थ व्हीआयपी ट्रॉली बॅग देण्यात आली.( पुढील कार्यक्रम9 जाने. कैलास नगर,10 जाने.मार्केट कमिटी1,2 जाने. गुप्ता लॉन्स) 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here