वणी: वणी येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते वणी ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधलेल्या ई सी आर पी 2 अंतर्गत २० खाटांचे अद्यावत अश्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती गृहाचे नूतनीकरण, सर्व सामान्य कक्षाचे नूतनीकरणाचे उद्घाटन यावेळी डाॅ भारतीताई पवार यांच्या कडून करण्यात आले.या वेळी बोलतांना सांगितले की काळा नुसार आपण आरोग्य सेवेत बदल घडवून आणत आहेत. प्रत्येक ठिकाणी आरोग्य सुविधा वाढविण्याचे काम करत आहे.या ठिकाणी सुविधा पुरवण्या साठी काही पदांची आवश्यकता आहे.त्या नुसार राज्य शासनाला प्रस्ताव देऊन पद निर्माण होतील अत्यावश्यक असलेली गरज या नविन फिल्ड हाॅस्पीटलच्या माध्यमातून होत असल्याने याचा फायदा निश्चित होईल असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांनी केले.यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.अशोक थोरात, वणी ग्रामिण रुग्णालयाचे डाॅ.बी एन मोरे,सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड,भाजपा पदाधिकारी सुनिल पवार, महेंद्र पारख, मयुर जैन, कुंदन जावरे ग्रा.सदस्य रंजना पाडवी,राकेश थोरात, विजय बर्डे ,किरण गांगुर्डे,सतिश जाधव, कैलास धूम,डाॅ.आचार्य, प्रकाश ठाकरे,चंद्रकांत रणधीर, कचोरदास करवंदे,निखिल कटारिया, रितेश पारख,परेश जन्नानी, बाळासाहेब घडवजे,दिनेश कडवे,चेतन चौधरी ,अजय पवार,रोशन जाधव, संतोष गावीत, विलास ठाकरे, योगेश रेहरे, कुणाल रावले, निलेश खरोटे, योगेश कोकाटे, भारत ढगे,आशुतोष बोराडे,जनार्दन गिरणदळे, रोशन कड, सोनू मोरे,जमीर शेख सह आदी नागरिक उपस्थित होते.
Home Breaking News केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते वणी येथे २० खाटांचे...