दलवट : माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दळवट येथे “मेरी माटी मेरा देश” अभियानामध्ये सहभाग घेतला डॉ. भारती पवार यांनी सुशोभित केलेल्या मातीच्या कलश यामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून मेरी मिट्टी मेरा देश संकल्पनेनुसार या परिसरातील मातीचे संकलन केले ज्या आदिवासी बांधवांना शेतजमीन आहे त्यांनी संकल्पनेनुसार कलश यामध्ये जगातील माती टाकली तर ज्या नागरिकांना स्वतःची शेत जमीन नाही त्यांनी चिमूटभर तांदूळ या कलश यामध्ये टाकून आपला सहभाग नोंदवला दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे. डॉ.भारती पवार यांच्या सह आदिवासींनी बांधवांनी कलश घेऊन पारंपारिक आदिवासी वाद्यांच्या तालात आदिवासी परंपरा सांभाळत लोककलेच्या माध्यमातून नृत्य करत परिसरातून मिरवणूक काढली आणि आदिवासी नृत्यही केले डॉ.भारती पवार यांनी या आदिवासी बांधवांबरोबर नृत्य मध्ये सहभाग घेतला आणि ढोल वादनाचाही आनंद घेतला नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस सुरू असताना देखील या भागात कार्यक्रमाच्या दरम्यान पावसाने कृपा केल्यामुळे आदिवासी परिसरातील मेरी मिट्टी मेरा देश चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोहिमेत सहभागी झाले.
Home Breaking News मेरी माटी मेरा देश अभियानातून साकारणार राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक अमृत वाटिका:- डॉ....