सुशिष्या परमविदूषी मधुरवक्ता प.पू. महाश्वेताजी म. साहब यांचे आगमन

0

नांदगाव : जैन धर्मीय चातुर्मास निमित्त आज आचार्य सम्राट 1008 आनंद ऋषीजी महाराज यांच्या सुशिष्या परमविदूषी मधुरवक्ता प.पू. महाश्वेताजी म. साहब यांचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात जैन समाज बांधवांनी स्वागत केले.साध्विंच्या स्वागत हेतू जालना जिन ते शनिमंदिर, कलंत्री गल्ली ते ओसवाल भवन पर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात आली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला.ओसवाल भवन येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा जैन समाजातर्फे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना गुरुमहराजांनी चातुर्मास साठी नांदगाव नगरीत उपस्थित राहणे हे आम्ही आमचे भाग्य असल्याचे सांगितले.या पुढील पाच महिने संपूर्ण जैन समाज धर्म आराधना करतो, तप, जप, प्रवचनात सहभाग घेत असतो. २४ तास पाणी न पिता जैन धर्मीय तपस्या करतो याला एक उपवास किंवा वास म्हणतात यात कोणी एक कोणी तीन वास तर अगदी ३१ उपवास करून धर्म आराधना केली जाते. जैन समाज बांधव या दिवसात व्यापारा पेक्षा चातुर्मास मधील धर्म आरधनेला जास्त महत्व वे वेळ देत असतो.या प्रसंगी नांदगाव जैन श्री संघ महिलांनी सारख्या साड्या तर पुरुषांनी शुभ्र वस्त्र धारण केले होते. जैन धर्मीय झेंडा, गळ्यात मफलर परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की यासारख्या अनेक घोषणा देऊन मिरवणूक संपन्न झाली.साध्वींच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातून विविध ठिकाणहून त्यांचे श्रावक येथे आले होते.चातुर्मास नियोजन आनंद नवयुवक मंडळ करत असून या प्रसंगी मोठ्या संख्येने जैन बंधु , भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here