नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे उद्घाटन संपन्न

0

नांदगांव : शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते आज नांदगाव येथे सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच खासदार केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नांदगाव येथे शिवनेरी शासकीय सभागृह शेजारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह ( मीटिंग हॉल) बांधण्यात आले आहे.शंभर दीडशे लोकांची बैठक होईल असा अद्ययावत सुविधा असलेला वातानुकूलित मीटिंग हॉल बांधण्यात आला आहे.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत या हॉल चे उद्घाटन आज जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, प्रमोद भाबड, विष्णू निकम सर, राजाभाऊ जगताप, डॉक्टर सुनील तुसे, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिढगे, बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, माजी सभापती तेज दादा कवडे, उपसभापती पोपट सानप, कैलास पाटील, एकनाथ सदगीर, सतीश बोरसे, कानाकलंत्री, निलेश इप्पर, आनंद कासलीवाल, राजाभाऊ देशमुख, डॉक्टर संजय सांगळे, मयूर भाऊ बोरसे, महेंद्र नाना दुकळे, आबा देवरे, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, रमेश पगार, अण्णासाहेब पगार, भैय्या पगार, डॉक्टर प्रभाकर पवार, डॉक्टर प्रवीण निकम, अंकुश कातकडे, सर्जेराव भाबड, किरण गायकवाड, आप्पा कुनगर, कपिल तेलोरे, आदींचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here