
पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीनंतर पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय जवानांनी चकमकीत ठार झालेल्या १६ जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे.
लडाखमध्ये झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाल्याचं भारताने जाहीर केल्यानंतरही चीन मात्र शांत होतं. आपल्या जखमी किंवा ठार झालेल्या जवानांची कोणतीही माहिती चीनकडून देण्यात आली नव्हती. पण पहिल्यांदाच चीनकडून अधिकृतपणे जवान ठार झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे.
