नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आले.आजचा हा क्षण अत्यंत गौरवशाली दिवस असुन देशाचा संसदीय इतिहास नव्याने लिहिला जाईल तेव्हा ही वास्तू म्हणजे त्यातील सोनेरी पान ठरेल यात शंका नाही.या ऐतहासिक सोहळ्याचे आपल्या आशीर्वादाने मला साक्षीदार होता आलं हे माझ भाग्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना मी विशेष करून धन्यवाद देते तसेच सौंदर्य आणि भव्यता,अध्यात्म आणि संस्कृती यांचा मनोहारी मिलाफ असलेले नवे संसद भवन म्हणजे देशवासीयांसाठी अभिमानाचा मानबिंदू ठरणार असल्याने या भव्य संसद भवनाची निर्मीती केल्याबद्दल आभार व्यक्त करते.पंतप्रधान मोदींजींच्या ‘माझी संसद ..! माझा अभिमान’..! या आवहानाला स्वीकारत या एक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता आलं देशाला एक वेगळ्या पद्धतीने आत्मनिर्भर भारत कसं करता येईल बदलत्या जागतिक गतिमानतेसह, भारत आगामी वर्षांत जनकल्याणासाठी आध्यात्मिक आणि सर्वांगीण विकासाभिमुख दृष्टीकोन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच आर्थिक आघाडीवरही मोठी भूमिका बजावेल. आपला हा भारत विकसनशील न होता विकसित भारत कसा होईल हा संकल्प घेवुन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आम्ही याचे साक्षीदार नाही तर शिल्पकार कसे होऊ शकतो. असा संदेश स्वर्णिम भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी देशभरात देत आहेत. या भव्य संसद भवनाच्या बांधकामासाठी देशाभरातील विविध ठिकाणांवरुन अनेक वस्तू मागवण्यात आल्या असून त्याचा इमारतीच्या उभारणीसाठी वापर करण्यात आला आहे नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. हे सागाचं लाकूड महाराष्ट्रातील नागपूरमधून मागविण्यात आलं आहे . संसद भवनात तयार करण्यात आलेलं फर्निचर मुंबईत तयार करण्यात आलं असुन संसद भनवात अशोक चिन्ह बनवण्यासाठी लागणारं साहित्य औरंगाबाद आलं आहे संसद भवनात महाराष्ट्राची ओळख दर्शविणा-या या भव्य कलाकृतीचा महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान आहे.
Home Breaking News देशाचे पंतप्रधान मोदीजीं च्या हस्ते स्वर्णिम भारताच्या लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद...