नांदगाव : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना निरंतर विविध शासकीय योजनांचा लाभ मोफत मिळवून दिला जात आहे. या माध्यमातून आज रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.या वेळी गरजू नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाते, या नंतर रेशन कार्ड घरपोच वाटप केले जाते.आज नवसारी व पानवाडी येथे 65 आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. अनेक वर्ष रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळाल्याने आनंद झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, संचालक किशोर भाऊ लहाने, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजाभाऊ देशमुख, माजी सभापती अंकुश तात्या कातकडे, भाऊराव भाऊ बागुल, सोमनाथ भाऊ घुगे, पिंटू भाऊ व्हरगळ, रघुनाथ भाऊ पारेकर, भाऊसाहेब गंभीरे, नवसारी गावचे सरपंच उपसरपंच व समस्त ग्रामस्थ नवसारी उपस्थित होत.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹