तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या “भारत राष्ट्र समिती” पक्षाचा झंजावात अहमदनगर जिल्ह्यात धडकला

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) तेलांगणा राज्याचे संपूर्ण देशात “यशस्वी माँडल” झाल्या नंतर आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा म्हणून तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्र शेखरराव यांनी आपला मोर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात वळविला आहे. एकुण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पक्षाची ध्येय धोरण सर्व सामान्य जनतेला माहिती व्हावी म्हणून पक्षातर्फे “शेतकरी जनजाग्रुती अभियान” संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. “भारत राष्ट्र समिती” पक्षाची अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार घौडदौड सुरू झाली असून अहमदनगर आणि बाभळेश्वर येथे दोन स्वतंत्र बैठका घेऊन पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोच करण्यासाठी यंत्रणेला कोण कोणत्या अडचणी निर्माण होत आहेत या वर सखोलपणे चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक दशरथ सावंत आणि पुणे विभागिय समन्वयक बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगर आणि बाभळेश्वर येथे दोन स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. अहमदनगर येथील बैठकीत सोमनाथ कराळे आणि राजेश भाटिया (अहमदनगर तालुका),संदिप राजळे(शेवगाव), संतोष वाडेकर(पारनेर), विवेक मोरे (राहुरी),टिळक भोस (श्रीगोंदा), अप्पासाहेब पवार(कर्जत जामखेड),बाभळेश्वर येथील बैठकीस संदिप शेनकर(अकोले), सुर्यभान गोरे (संगमनेर),सचिनवाबळे(कोपरगाव),विष्णुपंत खंडागळे (श्रीरामपूर),ओंकार बडाख (नेवासा),केशव बेंदे (राहता),ज्ञानेश्वर उंडे(बाभळेश्वर), भानुदास देशमुख, अशोक गायकवाड, संजय देशमुख, इमान पठाण यांचा समावेश होता. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here