0

दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली इथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. केंद्रीय आयुष आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या बैठकीचे बीजभाषण दिले. या बैठकीला सर्व एससीओ सदस्य देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक यांच्यासह उच्च स्तरीय भागधारक आणि भागीदार उपस्थित होते.डॉ.पवार यांनी एससीओ सदस्य राष्ट्रांना या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींसाठी सहयोग आणि देवाणघेवाण करण्याच्या मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते अजमावण्यासाठी वैद्यकीय मूल्य पर्यटनाची क्षमता जोखण्याचे आवाहन केले. भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र (GCTM) स्थापनेचा उद्देश एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये आधुनिक आणि पारंपरिक औषध प्रणालींचा लाभ घेण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना सुलभ करणे हा आहे, अशी माहितीही त्यांनी या मेळाव्याला दिली.मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली SCO सदस्य देशांमध्ये चांगले आरोग्य आणि कल्याण वाढवण्याचे आणि ते साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आरोग्य सेवा सहकार्य आणि भागीदारीसाठी पायाभूत काम करत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here