कोरोनावर मात / सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोनावर विजय, आज हॉस्पीटलमधून मिळाला डिस्चार्ज

0

मुंबई. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंयज मुंडे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर आज(दि.22) दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्टार्ज देण्यात आला. मुंडे यांच्यासह कोरोनाची लागण झालेले खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकासह इतरांनाही सुट्टी देण्यात आली आहे.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांच्यासह त्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक, दोन चालक, दोन अंगरक्षक आणि कुक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील धनंजय मुंडेसह खासगी सचिव, एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक आणि एका अंगरक्षकानेही कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आता आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here