आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने हिवतापाला हद्दपार करणे शक्य आरोग्य विभागाचे आवाहन

0

जळगाव दि. 20 :- किटकजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगाव व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत संपुर्ण जिल्हाभरात माहे जुन, 2020 हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रामिण व शहरी भागात ताप रुग्ण सर्वेक्षण रक्तनमुने संकलन दुषीत पाणीसाठे रिकामी करणे व त्यात अळीनाशक औषध टाकणे, डासोत्पत्ती स्थानकात गप्पीमासे टाकणे जनप्रबोधन करणे अशाप्रकारे कार्यावाही या संपर्ण महिन्याभरात केली जात असते हिवतापावर मात करायची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सहकारी यंत्रणेचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत माहे जून, 2020 मध्ये हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असून भविष्यात या आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने नागरिकांनी जागृत राहावे, व या आजाराची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालया किंवा इतर सरकारी रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत.
थंडी वाजून हुळहुळी भरणे,एक किंवा दोन दिवसाआड ताप येणे, येतो, अंग दुखणे, डोके दुखणे, घाम येणे, थकवा जाणवणे अशा प्रकारांची लक्षणे दिसताच तो हिवताप आहे असे समजून तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.हा आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. प्लाज्मोडियम हा परजीवी डासांमार्फत व्यक्तीच्या रक्तात पोहचतात व लाल रक्तपेशीवर (आर.बी.सी.) हल्ला करतात. त्यामुळे वरीलप्रमाणे लक्षणे निदर्शनास येतात. यासाठी हिवतापचे लवकर निदान व त्वरीत औषधोपचार करुन घ्यावे, उपचार न केल्यास वांरवार ताप येऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. त्वरीत औषधोपचार न घेतल्यास या आजारामुळे प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो.हिवताप नियंत्रणासाठी उपाय योजना :- ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जावुन गृहभेटी देवुन ताप रुग्णाशोधुन काढणे व तापसदृश्य रुग्णाचा रक्तनमुना घेवुन प्राथमिक औषोधोपचार करतात. व रक्तनमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. रक्तनमुना दुषीत आल्यास वयोमानानुसार तात्काळ समुळउपचार केला जातो. जिवशास्त्रीय उपाय योजने अंतर्गत डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडणेबाबत काटोकोरपणे अमलंबजावणी जनतेस हिवताप विषयक आरोग्य शिक्षण देणे, इ. कार्यवाही हिवताप कार्यालयामार्फत केली जाते.
जिल्हा स्तरावरुन (किटकसमंहारक) दिलेल्या गावांना घरोघरी भेटी देवुन डासांची घनता काढतात. ज्या गावांची घनता जास्त प्रमाण असल्यास संबधीत ग्रामपंचायत, प्रा. आ. केंद्र यांना अवगत केले जाते. शहरी भागात नागरी हिवताप योजना कार्यरत आहे.
मागणी 2 वर्षातील जळगाव जिल्ह्याची हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2019 हिवताप घेतलेले व तापसलेले रक्तनमुने 543051, दुषीत आढळून आलेले रुग्ण 4, माहे मे, 2020 अखेर हिवताप घेतलेले व तापसलेले रक्तनमुने 195966, दुषीत आढळून आलेले रुग्ण 2. प्रतिबंधात्मक उपाययोजना :- आपल्या घराभोवती, इमारतीच गच्चीवर पाणी साचु देऊ नका, घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करुन रिकामे करावे, या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडे करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत, अंगण व परिसरातील खड्डे बुजवावे त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरुन घेवुन झोपावे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, घराच्या छतावरील व परिसरातील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप,मडकी, शहाळे इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यांमध्ये रॉकेल किंवा क्रुड आईल टाकावे, गुरांना, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी नियमित स्वच्छ करावीत, कुलर, फ्रिज, फुलदाण्या यातील पाणी आठवड्यातून दोन वेळा बदलावे, हिवतापाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे.
भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होऊ नये म्हणुन आरोग्य खात्यामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असून हिवताप आजारावर मात करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी खालील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही म्हणजे योग्य काळजी व वेळीस केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारांवर नियंत्रण होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here