पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशात महिलांचा आत्मसन्मान वाढविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले गेले. विविध शासकिय योजनांचा लाभ ८० ते ९० टक्के महिलांपर्यंत पोहचला. या ९ वर्षात महिलांनी समृध्दीचा काळ अवलंबिला आहे. महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना राबविल्यामुळे महिलांचा आत्मसन्मान वाढला आहे. महिला विकासाचे हे काम तळागाळापर्यंत नेण्याचे कार्य करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी येथे केले.भाजपचे राष्ट्रीय संसरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी मोदी सरकारकडून प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला. या सरकारची सत्तेची ९ वर्ष ही भारताच्या विकासाची आणि देश सुरक्षित करण्याची आहे. गरीबांना मोफ त अन्नधान्य, गरीबांना हक्काचे घर, प्रत्येक क्षेत्राचा विकास यासारख्या योजनांमुळे मोदींनी ९ वर्षात देशाला पुढे नेण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजपचे गोव्याचे खासदार विनय तेंडूलकर, माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांनी केंद्र सरकार पुरस्कृत नगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आकडेवारी विषद केली. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी नांदगाव तालुक्यांचा योजनांचा आढावा घेतला. अकबर शाह यांनी तालुक्यातील विविध योजनांची माहिती दिली.तसेच तहसिलदार डॉ सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, संदीप नरवडे,सचिन संघवी, नितीन परदेशी, ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई दौड, दत्तराज छाजेड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, सौ. अंजूमताई कांदे, अकबर शाह,सचिन लुणावत, एकनाथ बोडखे, बुढनबाबा शेख, दिपक पगारे, नारायण पवार यांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.