औरंगाबाद येथे यहोवाच्या साक्षीदाराचे विभागिय स्नेह संमेलन थाटात संपन्न

0

औरंगाबाद (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद(संभाजी नगर) विभागातील यहोवाच्या साक्षीदाराचे विभागिय स्नेह संमेलन औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापिठाच्या सभागृहात थाटात संपन्न झाले.प्रथम एकमेकांचे स्वागत करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या मध्ये भाषणे,प्रेम संदेश,गीते,पवित्र शास्त्रातील शास्त्रीय शिला लेखातील इफिसकर चार ः तिन ही वचने ही वाचून दाखविण्यात आली.शेवटच्या घटकापर्यंत कार्यक्षेत्रात काम करत असताना आलेले आपले अनुभव अनेकांनी कथन केले.आणि यहोवाच्या मार्गावर चालण्यासाठी समाजामध्ये एकता,समता, आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आपण अजून काय केले पाहिजे यावर अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केले.भारत देश हा जगाला शांतीचा संदेश देणारा देश आहे.त्याच मार्गाने आपण चालले पाहिजे. जागतीक स्तरावर आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी कशाप्रकारे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.आणि समाज मनावर घातक आणि विपरीत परिणाम करणाऱ्या पोनोग्राफी पासून आपल्या कुटुंबाला कसे दुर ठेवता येईल यांच्या वरही जाहीरपणे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.अहमदनगर, नाशिक, ठाणे, अमरावती, चंद्रपूर,श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी,भेंडा, कुकाणा या भागातील अनेक मांन्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. ( सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here