महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध :- डॉ.भारती पवार

0

कळवण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते कळवण येथे करण्यात आले.यावेळी डॉ. भारती पवार यांनी उपस्थित महिलांना त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. केंद्रासह राज्य शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहचायला हव्या. त्यासाठी शासकीय योजनांची माहितीपुस्तिका घरोघरी पोहचवा. निराधारांना पेन्शन,शौचालय, रेशन कार्ड, घरकुलासह अन्य समस्यांवर निराकरण यावेळी करण्यात आले तसेच इतर शासकीय योजनांचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा अश्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना डॉ. भारती पवार यांनी केल्या.कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, मानव विकासअभियानांतर्गत मोफत सायकल, महिला बालविकासाच्या अंतर्गत अंगणवाडीना वॉटर पुरिफायर व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी नंदकुमार खैरनार, दिपक खैरनार, नारायण नाना हिरे, सुभाष शिरोडे ,जगन अण्णा पाटील, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, हितेंद्र पगार, कृष्णकुमार कामळसकर, सुधाकर पगार, एस. के. पगार, निंबा आप्पा पगार, भारती पगार, काशिनाथ गुंजाळ,तसेच प्रांत विशाल नरावडे,तहसीलदार पाटील मॅडम, गटविकास अधिकारी म्हसके मॅडम, गटशिक्षणाधिकारी बच्छाव साहेब,महिला पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here