भारत राष्ट्र समिती २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार : सावंत

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगाणा राज्याची निर्मिती करून शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या योजना राबवून शेतकरी आत्महत्या थांबवून देशात एक आदर्श निर्माण केला आहे. तोच आदर्श विकास डोळ्यासमोर ठेवून “भारत राष्ट्र समिती”या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रात घौडदौड सुरू असून महाराष्ट्रातील एकूण २८८विधानसभा मतदारसंघात भारत राष्ट्र समिती एकाच वेळी निवडणूका लढवणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे को आँर्डीनेटर दशरथ सावंत यांनी दिली ते अहमदनगर येथिल विश्राम ग्रुहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक संदिप राजळे, श्रीगोंदा मतदार संघाचे समन्वयक टिळक भोस,राहुरी मतदारसंघाचे विवेक मोरे,नगर शहर मतदारसंघाचे राजेश भाटिया, हे ऊपस्थीत होते.पक्षीय पातळीवर एकाच वेळी सर्व महाराष्ट्र राज्यात जणजाग्रुती अभियान सुरू असून संपूर्ण राज्यातील जनता भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत करीत आहे. आता प्रस्थापित सर्व पक्षांना जनता कंटाळली असुन लोकांना हा नवीन पक्षाच्या ध्येय धोरणाचा आधार वाटू लागला आहे.सामांन्य शेतकरी या नवीन पक्षाकडे वळू लागले आहेत. आता हा नवीन पक्ष कोणाला तारणार आणि कोणाला याच विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here