मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नायक मकरंद अनासपूरे यांच्या उपस्थितीत रंगला खासदार चषक सोहळा

0

दिंडोरी:  लोकसभा मतदारसंघात खासदार चषक या खेळ मोहत्सवाचे खासदार डॉ भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते .या महोत्सवाला २७ मे पासून सुरुवात झाली होती व कार्यक्रमाचा समारोप ३१ मे रोजी श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचार्याश्रम चांदवड येथे मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नायक मकरंद अनासपूरे व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.खासदार चषक या खेळ मोहत्सवात दिंडोरी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला या तालुक्यातील युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यात क्रिकेट, व्हॉलीबॉल रस्सीखेच, कबड्डी या चार खेळाचा समावेश नोंदवून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजयी संघाना ट्रॉपी,मेडल ,प्रशस्तीपत्र व बक्षिस यावेळी वितरण करण्यात आले.राज्यात खासदार चषक स्पर्धा प्रायोगिक तत्वावर घेण्यात आली असून या खेळ महोत्सवाला दिंडोरी लोकसभा मतदार संघातील युवक व युवतींचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने हा खेळ महोत्सव पुढील वर्षांपासून दिंडोरी लोकसभा खासदार चषक पॅटर्न संपूर्ण राज्यात व नंतर देश पातळीवर राबविण्याचा मानस आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, केदा नाना आहेर, बेबीलाल संचेती, आत्माराम कुंभार्डे,भूषण कासलीवाल, जवाहरजी आबड,कांतीलाल बाफना,अशोक काका व्यवहारे,दीपक खैरनार, मनोज शिंदे, रमेश थोरात, गणेश शिंदे, किशोर चव्हाण, भागवत बाबा बोरस्ते,जय फुलवाणी,मोहन शर्मा, बाळासाहेब माळी,गिताताई झाल्टे,योगेश साळुंखे,प्रशांत ठाकरे,शांताराम भवर, वाल्मीक वानखेडे,गोरख ढगे, गोविंदराव कोठारे, सुभाष शिरोडे,हेमंत रावले, कैलास गुंजाळ, महेश खंदारे, विशाल ललवाणी, मच्छिंद्र गांगुर्डे, नितीन गायकर,राजु गांगुर्डे, संजय पाचोरकर, योगेश ढोमसे,काशिनाथ गुंजाळ, डॉ. अविनाश महाजन,देवा पाटील, अनिल कोठुळे,उमेश उगले, मुकेश आहेर,अविनाश टिळे, दत्ता शिंदे ,आनंद शिंदे, राजू परदेशी, मनोज बांगर,निलेश काळे ,उमेश जाधव, गणेश शिरसाठ, सचिन निकम, विठ्ठल चव्हाण, विजय धाकराव, तनवीर पठाण,वर्धमान पांडे, विलास बच्छाव, अक्षय माकूणे,माणिक चव्हाण, दिलीप कोणे,जालिंदर चव्हाण, संतोष चव्हाण सर्व तालुका भाजपा पदाधिकारी, तालुका क्रीडा संयोजक सह मोठ्या प्रमाणात युवा खेळाडू व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here