
मुंबई : देशातील इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भूगोलासह देदीप्यमान इतिहास आहे याचे कारण या भूमीत संतमहंतासह तेजस्वी राष्ट्रपुरुष जन्माला आले. आजही असे एकही क्षेत्र अपवाद नाही की, महाराष्ट्रातील प्रतिभावान अग्रेसर नाहीत. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन साजरा करताना पूर्वसूरींच्या आपण सर्वजण ऋणाईत राहूया असे आवाहन ज्येष्ठ निवेदिका सौ मंजिरी मराठे यांनी शिवाजी पार्क येथे काढले.महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यवंशी क्षत्रिय परस्पर सहाय्यक मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजीपार्क येथे संयुक्त महाराष्ट्र कलादालन व स्वा. सावरकर स्मारक समिती तर्फे म्युझिक अ़ॅन्ड लाईट शो चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संस्थेचे पदाधिकारी व सभासद आणि प्रेक्षक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद पाटील, कार्यवाह श्री लक्ष्मीकांत राऊत यांच्या हस्ते स्मारक समितीच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजक श्री राजन देसाई यांनी आभार मानले,
