
अहमदनगर (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)समस्त पुजारी धनगर समाजाच्या वतीने पट्टणकोडोली ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे विठ्ठल बिरदेव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने २ ते ९ मे या काळात काकड आरती,ग्रंथवाचन,भजन,हरिपाठ,प्रवचन,हरीजागर,धनगरी ओव्या,विठ्ठल बिरदेव ग्रंथ महात्म्य आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, होणार आहे. सर्व ह.भ.प.माउली महाराज चव्हाण, डॉ. रावसाहेब पुजारी, महादेव मोठे महाराज, नारायण खाणू मोठे देसाई महाराज, खानदेव नारुखान महाराज, आनंदा कोळी महाराज, कल्लाप्पाण्णा बाळाई महाराज, विनायक पाटील महाराज यांची प्रवचणे तर सर्व ह.भ.प.सुप्रियाताई बंडगर महाराज,अनिल महाकले महाराज, माधवनंदजी महाराज, पुर्णानंद काजवे महाराज, विजय शिंदे महाराज, शिवाजीराव पन्हाळकर महाराज,सिद्धाम काळे महाराज, यांची किर्तने होणार आहेत.दि.९ मे२०२३ रोजी बिरदेव जन्मोत्सवा निमित्ताने पुष्पव्रुष्टी होणार आहेत तसेच सकाळी १०ते१२ ह.भ.प.सुभाष महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन होउन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल बिरदेव देवस्थानचे पुजारी नारायण खाणू मोठेदेसाई आणि पट्टणकोडोली ग्रामस्थ यांनी केले आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
