
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करावी, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले.महाराष्ट्रातील एकूण उत्पादना पैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते जरी यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी बिगर मोसमी पाऊस आणि सोबत गारा या नैसर्गिक आपत्तीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे परिणामी शेतकऱ्याची गळचेपी न होता त्याला दिलासा देण्यात यावा असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी नमूद केले यावर पियुष जी गोयल यांनी याबाबत सकारात्मक असा प्रतिसाद देत लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
