
सुरत : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आज सुरत, गुजरात येथे मा.खासदार प्रभू वसावा जी आणि इतर मान्यवरांसह नर्सिंग एज्युकेशनमधील नवीनतम आव्हाने, नवोन्मेष आणि प्रगती या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले.या परिषदेत विषय तज्ञ आणि नर्सिंग प्रोफेसर या क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि जागतिक स्तरावर नवीनतम प्रगतीचा अवलंब करून त्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वयाने काम करण्यात येणार असून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मा. आरोग्य मंत्री श्री. मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देशातील नर्सिंग शिक्षण प्रणालीला जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी काम करत आहे तसेच देशात 157 नवीन शासकीय नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
