
नवी दिल्ली. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 32 हजार 753 झाला आहे. मागच्या रविवारी, म्हणजेच 16 म रोजी संक्रमितांची संख्या 90 हजार 649 होती. त्या दिवसापर्यंत 34 हजार 257 रुग्ण ठीक झाले होते, तर 2872 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज सकाळपर्यंत देशात 1 लाख 31 हजार 422 संक्रमित झाले. तर, 54 हजार 385 रुग्ण ठीक झाले आणि 3867 मृत्यू झाले. म्हणजेच मागील 7 दिवसात 40 हजार 773 रुग्ण वाढले आणि 20 हजार 128 ठीक झाले.
काल सर्वात जास्त संक्रमित वाढले
आज आतापर्यंत ओडिशात 67, राजस्थान 52, चंडीगड 13, गोवा 11 आणि असाममध्ये 4 रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी शनिवारी संक्रमितांच्या संख्येत सर्वाधिक 6 हजार 661 रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org आणइ राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्री आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 31 हजार 868 संक्रमित आहेत. यापैकी 73 हजार 560 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर 54 हजार 440 ठीक झाले आहेत.
अपडेट्स…
- पंजाबच्या जालंधरमध्ये काही प्रवासी मजूर आपल्या गावी जाण्यासाठी रजिस्ट्रेशनची वाट पाहत 5 दिवसांपासून फ्लायओव्हर ब्रीजखाली बसले आहेत.
- ओडिशाात एका महिलेने श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिला. ही ट्रेन तेलंगाणाच्या सिकंदराबादवरुन ओडिशाच्या बलांगिरला जात होती. ट्रेन बलांगिरला पोहचल्यावर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये आज टोटल लॉकडाउन आहे. मेडिकल व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवारी सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.
बीएसएफचे 21, सीआरपीएफचे आणखी 6 जवान झाले बाधित
बीएसएफचे आणखी 21 जवान कोरोना बाधित आढळून आले आहेत. या सर्वांवर कोविड-19 रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. बीएसएफमध्ये आतापर्यंत 406 जवान बाधित झाले. त्यापैकी 286 जवान उपचार घेऊन घरी परतले. सीआरपीएफमध्ये नवे 6 रुग्ण आढळून आले आहेत. आता त्यात 350 रुग्ण असून पैकी 129 सक्रिय आहेत.
महाराष्ट्रात पोलिस विभागातील बाधितांचा वेगही कमी झालेला नाही. आतापर्यंत 1 हजार 671 पोलिसांनी बाधा झाली आहे. त्यात 174 पोलिस अधिकारी, 1 हजार 497 पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 541 पोलिस बरे झाले आहेत. राज्यात पोलिसांना लोकांच्या उपद्रवाचाही सामना करावा लागला. त्यात आतापर्यंत 85 पोलिस जखमी झाले.
यूपी : गर्दी जमवून रेशन वाटप, सपा आमदार, मुलावर गुन्हा
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे फिजिकल डिस्टेंन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सपा आमदार इकराम कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरेशी यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर मुलासह शेकडो लोकांची गर्दी करून रेशनचे वाटप केले. रेशन वाटप करताना त्यांनी फिजिकल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे मुळीच पालन केले नाही. कुरेशी यांनी मास्कही लावलेला नव्हता. अनेक वर्षांपासून मी अशा प्रकारे घरी रेशन वाटप करत आलो आहे. आता गर्दी झाली तर त्याला काय करावे? अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी दिली.
