नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मा. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख जी मांडविया याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनसाठी मिशन स्टीयरिंग ग्रुपच्या दुसर्या बैठकीत सहभाग घेतला यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनवाल जी, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी जी आणि NITI आयोग सदस्य डॉ. VK पॉल जी उपस्थित होते. झालेल्या बैठकीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि एबीडीएम योजनेच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा देण्याचा मार्ग यावर चर्चा करण्यात आली. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकार तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे जेणेकरून नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देता येतील.