
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथील मळगंगा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काठी उभारणे,देवीला हळद लावणे,महिलांचे अनुष्ठान,देवीला गंगा जलाभिषेक, विद्यमान सरपंच सौ.छायाताई भाउसाहेब उघडे यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व माता भगिनी सुवासिनींच्या हस्ते वाजत गाजत देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. छबिन्यात काठी,पालखी मिरवणूक, शोभेच्या दारुची आतषबाजी, कलाकारांच्या हजेऱ्या,आणि जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.यात्रा कमेटीच्या वतीने हनुमान टाकळी सोसायटीचे व्हा.चेरमन भाउसाहेब उघडे,माजी सरपंच रमेश आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव उघडे,डॉ संभाजी आव्हाड, मेजर विनोद खंबायत,अर्जुन आंधळे,भरत आंधळे,राहुल आव्हाड,आदिनाथ पांढरे,बारकू वाघमोडे,अशोक आव्हाड, दिपक धनवटे,यांनी विषेश परिश्रम घेतले.पंचक्रोशीत नावाजलेले नामवंत जेष्ठ पैलवान उत्तमराव आंधळे,महिला पैलवान मोनिका रमेश आंधळे,हेही आवर्जून उपस्थित होते.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँन्स्टेबल भिंगारदिवे, आणि पोपट आव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यात्रेच्या काळात गावातील सर्व पोलवर लाईट न लावल्याच्या कारणावरून गहिनीनाथ आव्हाड यांनी खंत व्यक्त केली. किरकोळ बाचाबाची वगळता यात्रा महोत्सव शांततेत संपन्न झाला.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).
