
लासलगाव : डॉ. भारती पवार यांनी लासलगाव येथे बुथ सशक्तीकरण अभियान कार्यशाळेला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे. पी. नड्डा जी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बूथवर भाजपाला बळकट करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापली भूमिका पार पाडावी असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.यावेळी सुनिल बच्छाव, सुवर्णा ताई जगताप, डी. के. नाना जगताप, भूषण कासलीवाल, नितीन पांडे, कैलास सोनवणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
