
रायपूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रायपूरच्या भेटीदरम्यान जनऔषधी दिवस निमित्त आयोजित सोहळ्यात सहभागी होऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारचा हा उपक्रम सर्व नागरिकांना स्वस्त दर्जेदार औषधे आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याच्या वचनबद्धतेसह देशभरातील लाखो रुग्णांना मदत करत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
