
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण दिनानिमित्त ‘औषधनिर्माण अन्वेषण-2023’ चे उद्घाटन करण्यात आले, औषध निर्मिती क्षेत्रातल्या अद्ययावत घडामोडींवर आधारलेला अभ्यासक्रम ठेवत औषधनिर्मिती क्षेत्रातले सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणारा तसेच, विशेष औषधांवर सविस्तर माहिती असेल, ज्याचा लाभ देशभरातील औषध विक्रेत्यांना होऊ शकेल, असा दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटले आहे. आज राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण दिनानिमित्त त्यांच्या हस्ते, औषधनिर्माण अन्वेषण-2023 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते भारतीय औषधनिर्माण परिषदेच्या ‘वन स्टॉप-नॉन स्टॉप’ या डिजिटल रोजगार पोर्टलचे उद्घाटन ही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने देशाच्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी यशस्वी पाया घातला आहे, असेही डॉ. पवार यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारने एक लवचिक, कार्यक्षम आणि परिस्थितीशी अनुकूल आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दिशेने मनुष्यबळविकसित करण्यास प्राधान्य दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
