ना.श्री रावसाहेब दानवे दादा यांना मुंबई येथे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन

0

मुंबई  : इगतपुरी रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा तसेच रेल्वे तिकीट व आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.श्री रावसाहेब दानवे दादा यांना मुंबई येथे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.याप्रसंगी किरण फलटणकर, भाजपा युवा मोर्चा नाशिक उपजिल्हाध्यक्ष योगेश चांदवडकर, इगतपुरी तालुका युवा मोर्चा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, इगतपुरी शहर युवा मोर्चा अध्यक्ष अभिजित जाधव, उपाध्यक्ष रोहन दगडे उपस्थित होते.मंत्री महोदयांनी, सर्व निवेदन वाचल्यावर इगतपुरीकरांसाठी कोणत्या गाड्यांना थांबा महत्त्वाचा आहे अशा गाड्यांची यादी पुन्हा सादर करण्यास सांगितले. तसेच इगतपुरी मध्ये रेल्वेची मुबलक जागा पडिक असुन तिथे रेल्वेचा कोणता प्रकल्प आणता येईल का ? ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल त्यासाठी सुध्दा पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच इगतपुरीतील सर्वच थरांतील प्रतिनिधी घेऊन भेटण्यासाठी बोलवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here