
आसाम : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गोलपारा आसामच्या जिल्ह्याच्या भेटीदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत चामागुरी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केले. माननीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत जी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती मंत्रालय मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे देशातील प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.
