
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जवखेडे खालसा येथील व्रुद्धेश्वर मंदिरात आळंदीचे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निव्रत्ती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने हरीनाम सोहळ्याची सांगता झाली. उपस्थित श्रोत्यांना मतकर महाराजांनी मंत्रमुग्ध केले.या सोहळ्यात ह.भ.प.श्रीराम महाराज मचे, ह.भ.प.आसाराम महाराज बडे, ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर यांचीही किर्तने झाली.ह.भ.प. आबाजी महाराज आंधळे यांनी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले.भगवान सरगड,आदिनाथ वाघ,शाळेतील शिक्षक व्रुंद,यांनी अन्नदान केले. काल्याची पंगत ह.भ.प.प्रल्हाद किसन आंधळे महाराज यांनी दिली. दररोज काकडा भजन,हरिपाठ, हरीजागर,ग्रंथ वाचन हे उपक्रम राबविण्यात आले.व्रुद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणेचे आयोजन केले होते. व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धव राव वाघ,जेष्ट नेते पोपटराव आंधळे, कोल्हापूरच्या विठ्ठल बिरदेव मंदिराचे पुजारी आणि रिटायर्ड डी.वाय.एस.पी. नारायण खाणू मोठेदेसाई हे ही आवर्जून उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. चारूदत्त वाघ,वैभव आंधळे,शिवाजी मतकर, ज्ञानदेव मतकर, दगडूशेठ आंधळे,संभाजी वाघ यांनी विषेश परिश्रम घेतले. तसेच शिवजयंती आणि आमदार मोनिका ताई राजळे यांच्या वाढदिवसा निमित्त महीलांचे हिमोग्लोबीन तपासणी शिबीरही आयोजित करण्यात आले होते.अनेक महीलांनी या शिबीराचा लाभ घेतला.
