अहिल्यानगर” नामांतरासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्याचे “अहिल्यानगर”हे नामांतर करावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.नामांतराच्या मागणी साठी जिल्हा नामांतर क्रुतीसमितीचे समन्वयक अहिल्यादेवीचे माहेरचे वंशज अक्षयदादा शिंदे,कोल्हापूरच्या विठ्ठल बिरदेव मंदिराचे पुजारी आणि रिटायर्ड डी.वाय.एस.पी. नारायण खाणू मोठेदेसाई, विजय तमनर,पत्रकार सुनिल नजन,संतोष गुंजाळ,पोपट बाचकर, बाळासाहेब विटनोर, संजय वडीतके,वैभव तमनर,चव्हाण महाराज, देवेंद्र लंभाते, अरुण मतकर,यांनी जनजागृती साठी सर्व तालुक्यातील गावात जिल्हाभर दि.९ फेब्रुवारी पासून रथयात्रा काढली होती.त्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयातील महामोर्चाने झाला. महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राज्य कर्त्या विषयी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाचे तळमळीचे नेते जगन्नाथ दादा गावडे,विनायक नजन सर,कानिफ कर्डिले, गणेश कोरडे,भाउसाहेब कोल्हे,अशोक गाडे,गणेश खंबरे,संजू मिसाळ, महेश कर्डिले, दिपक करे,शंकर कर्डिले, रामभाऊ कोल्हे,पोपट डुक्रे,भारत ईथापे,सोमनाथ वीर,पप्पू पाचे,विजय जाधव,योगेश कर्डिले, बाळू गवते,दिपक हराळे,संदिप हराळे,योगेश डुक्रे, प्रशांत वैद्य, विजय नजन,पाथर्डीचे रमेश हंडाळ,कल्पजित डोईफोडे सर,अंकुश बोके,नेवासा तालुक्यातील भेंडे येथील सरपंच सौ.उषाताई मिसाळ, डॉ लहाणू मिसाळ,प्रसिद्ध उद्योजक बापुसाहेब नजन, संभाजी मिसाळ, महेंद्र नजन,श्रीराम देशमुख, किशोर मिसाळ यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. शेवटी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.अँड अक्षय भांड,दत्तात्रय खेडेकर, अण्णा साहेब बाचकर, भारत मतकर यांनी योग्य प्रकारे नियोजन केले होते.लवकरात लवकर नामांतर न झाल्यास येत्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल असे आश्वासन पारनेरचे आमदार निलेशजी लंके यांनी फोनवरून दिले. ते उपस्थित श्रोत्यांनी माईक वरुन ऐकले.या नामांतरास,आमदार रोहीत पवार, आमदार बाळासाहेब थोरात,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार शंकरराव गडाख,आमदार आशुतोष काळे,माजी मंत्री अण्णा डांगे, घनश्याम शेलार,भाजपचे माजी खासदार, विकास महात्मे यांनी पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here