
नवी दिल्ली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या संख्या 74 हजार 926 झाली आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधिक 1900 रुग्ण ठीक झाले. यापूर्वी 10 मे रोजी 1669 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तसेच, मंगळवारी 3610 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे आकडे covid19india.org वेबसाइटवरील डेटा आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 74 हजार 281 संक्रमित आहेत. 47 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू असू, 24 हजार 386 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 2415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना अपडेट्स
- झारखंडचे आरोग्य सचिव नितिन मदान कुलकर्णी यांनी बुधवारी सांगितले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमधऊन सोमवारी रात्री रांचीला गेलेल्या एका व्यक्तीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 173 झाला आहे.
- शंघाई सहयोग संघटनेची बुधवार बैठक आहे. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सामील होतील. यात मुख्यत्वे कोरोना व्हायरसशी सामना करण्याबाबत चर्चा होईल. ही बैठक व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे होईल.
- एअर इंडियाच्या 1377 फ्लाइट बुधवारी कुआलालम्पुर, मलेशियावरुन मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनेशनल एअरपोर्टवर येतील. यात 225 प्रवासी आहेत.
- देशातील कोरोना कम्युनिटी ट्रांसमिशन ओळखण्यासाठी 21 राज्यातील 69 जिल्ह्यांना निवडण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनेनुसार या जिल्ह्यात अँटीबॉडीजची तपासणी केली जाईल. एका जिल्ह्यातील 10 क्लस्टर क्षेत्रातील प्रत्येक घरातून प्रत्येकी एका व्यक्तीचे सँपल घेतले जाईल.
