राज्य : अभाविपच्या माध्यमातुन पुर्वाचंलला प्रेमाने,भावनेने इतर भारताशी जोडणारी SEIL यात्रा राष्ट्रीय एकात्मता वाढवणार “पाऊल” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून पूर्वांचलला इतरभारताशी जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अभाविपचा हा कार्यक्रम त्याच भावनेला बळ देणारा आहे.असे प्रतिप्रादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार त्या SEIL Students ‘Experiance in Inter-state Living अंतर राज्य छात्र जीवन दर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेचा भाव जागृत करण्यासाठी नम्र उद्देशाने काम करणारा हा अभाविपचा एक आयाम आहे. ईशान्य भारतातील तरुण आणि इतर राज्यांमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशाने अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेची (SEIL) १९६६ साली सुरूवात करण्यात आली. अभाविपने राष्ट्रीय एकात्मता यात्रेच्या उपक्रमांतर्गत वार्षिक अभ्यास दौरा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करण्यास सुरूवात केली, ज्याने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. अंतर राज्य छात्र जीवन दर्शन यात्रेमुळे तरुणांमध्ये भावनिक संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक विद्यार्थ्याला स्थानिक यजमान कुटुंबात सामावून घेतले जाते, जेथे त्यांना पाहुणे नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून वागणूक दिली जाते. या उपक्रमामुळे भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होते आणि यजमानांना देशाच्या इतर भागांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या संस्कृतींची विविधता समजून घेण्यास मदत होते.
या उपक्रमातर्गंत अभाविपच्या वतीने आयोजित भारतीय एकात्मता यात्रेच्या पुर्वाचंलच्या विद्यार्थीच्या नागरी सन्मान सोहळ्या प्रसंगी डॉ. भारतीताई बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर या वेळी अभाविप पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मिलींद मराठे, SEIL यात्रेचे स्वागत अध्यक्ष हेमंत राठी, स्वागत समिती सचिव संजय किर्तने, महानगर अध्यक्ष प्रदिप वाघ, महानगर मंत्री ओम मालुंजकर व अनुचल डोले SEIL सदस्य उपस्थित होते..!
Home Breaking News अभाविपच्या माध्यमातुन पुर्वाचंलला प्रेमाने,भावनेने इतर भारताशी जोडणारी SEIL यात्रा राष्ट्रीय एकात्मता वाढवणार...