
मनमाड : महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले, या वेळी जनतेच्या सोयीसाठी दोन फिरते दवाखाने, करंजवण योजना बघण्यासाठी दोन मोफत बस सुविधा, दिव्यांग बांधवांसाठी दीडशे सायकल वाटप, दोन मोफत जेसीपी, आमदार सुहास कांदे यांच्या तर्फे लोकार्पण करण्यात आले, तसेच नांदगाव साठी 25 कोटीचे शिवसृष्टी चे या वेळेस उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार, खनिकर्म मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी गुलाबराव पाटील केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आदींची भाषणे झाली, विकास कामासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी आमदार सुहास अण्णांना दिले, यावेळेस MIDC ची घोषणा करण्यात आली,जीर्ण झालेली नगरपालिकेचे कामकाजासाठी लवकरच 10 कोटी चा निधी मंजूर करून देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, मनमाडच्या जनतेसाठी विकासपुरुष म्हणून आमदार सुहास कांदे आपल्याला लाभले आहेत , हे मनमाडकर यांचे भाग्य आहे गेलं कित्येक वर्षापासून चा पाणी प्रश्न केवळ सुहास कांदे मुळे मार्गी लागलेला आहे, असेही ते यावेळेस म्हणाले.या सुवर्ण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिला माता भगिनी तसेच पुरुष वर्ग उपस्थित होते,
