
मनमाड : भारतीय कामगारांचे दिग्विजयी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड़ रेल्वे मैदानावर दि १२/१३ फेब्रुवारी १९३८ रोजी संबोधित केलेल्या मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्तऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे अभिवादनचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम व ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तर विनोद झोडपे व संदीप धिवर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन हर्षद सुर्यवंशी यांनी केले.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे सहायक सचिव सुनील सोनवणे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड, विशाल त्रिभुवन, राहुल शिंदे, अभ्युदय बागुल, मनिष कासवटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लासलगाव येथे रेल्वे अपघातात शहिद झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
