जातीपातीचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजनाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने ओळखावे : अजित पवार

0

अहमदनगर : ( सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करून स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या धर्मांध शक्तींना महाराष्ट्राच्या जनतेने आता तरी ओळखावे असे उदगार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी काढले. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीसगाव व इतर तेहतीस गावाच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या भुमिपुजनानंतर झालेल्या पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.त्यांच्या समवेत आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके,माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे,पाथर्डी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,संदिप राजळे,माजी सभापती काशिनाथ लवांडे,इलियास शेखसर हे होते.या वेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.ही पाणी पुरवठा योजना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर झालेली होती असेही पवार यांनी सांगितले. यावेळी राहुरीच्या नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे, तिसगावच्या सरपंच सौ मुनिफा शेख,उपसरपंच संगिता गारुडकर,माजी सरपंच मंगलताई म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ योगिताताई राजळे, संजय पाटील लवांडे, यांच्या सह पाथर्डी-राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी सुनिल नजन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here