
नाशिक: दिनांक 29/1/23 रोजी मातोश्री रमाबाई वसतिगृहात किशोरवयीन समस्या व समायोजन या विषयावर मार्गदर्शन करतांना मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तथा धम्मगिरी योगा महाविद्यालयाच्या समनवयक गीताताई गायकवाड यांनी विविध खेळ व प्रश्नोत्तरातून विद्यार्थीनी वर्गाशी संवाद साधला 13 ते 18 वयोगटातील होणारे शारीरिक मानसिक बदल ,सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श, विविध गोष्टींचे वाटणारे आकर्षण, आभासी जगातील मैत्री,स्वतःच्या शरीराबद्दल नैसर्गिक प्रक्रियेबद्दल अपूर्ण असलेली गैरसंमजावर आधारलेली माहिती त्यामुळे होणारे शारीरिक मानसिक लैंगिक शोषण व छेडछाड इत्यादि बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यात अनेक विद्यार्थीनिनी आपले वयक्तिक अनुभव मांडले.अध्यक्ष कॅ.कुणाल गायकवाड व सचिव पी.के.गायकवाड यांनी सदर कार्यक्रमा करीता निमंत्रित केले होते.अधिक्षक श्रीमती डेरले यांनी आभार प्रदर्शन केले.
