
नाशिक : नाशिक विभागाची सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक माननीय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 चा विकास आराखडा अंतिम करणयात आला या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार तसेच पालकमंत्री श्री.दादाजी भुसे साहेब,महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवळ, आमदार डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे, Adv. राहुल ढिकले, हिरामण खोसकर , नरेंद्र दराडे , सरोज आहिरे विधानसभा सदस्य हे उपस्थित होते सदर बैठकीचे प्रस्तावित विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांनी सादर केले तसेच जिल्हाधिकारी श्री गंगाधरन डी यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध विकास कामांचा आराखडा सादर केला यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव श्री लिमये साहेब नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर साहेब,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.यावेळी डॉ. भारती प्रविण पवार यांनी ग्रामीण व शहरी विकास कामांसाठी ज्यास्तीत ज्यास्त निधीची मागणी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसजी यांचेकडे केली असता त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
