देशात कोरोना / रुग्णांचा आकडा 63 हजार 347 वर; केंद्राने म्हटले- मागील 24 तासात 10 राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशात एकही नवीन रुग्ण नाही

0

नवी दिल्ली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, 10 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मागील 24 तासात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तसेच, 4 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सुरुवातीपासून आतापर्यंत एकही रुग्ण सापडला नाही. त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारकडून अनेक राज्यात 72 लाख एन-95 मास्क आणि 36 लाख पीपीई किट पाठवण्यात आले आहेत.

देशातील कोरोना बाधिकांचा आकडा 63 हजार 347 झाला आहे. रविवारी दिल्लीमध्ये 381, आंध्रप्रदेशात 50, राजस्थानमध्ये 33 आणि बिहारमध्ये 18 रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी शनिवारी 2951 रुग्ण वाढले. तसेच, काल 1414 रुग्ण ठीक झाले. हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 62 हजार 939 संक्रमित आहेत. 41 हजार 472 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 19 हजार 357 ठीक झाले, तर 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

> ६ दिवसांत सर्वाधिक ४५२२ रुग्ण महाराष्ट्रात वाढले. या पाच राज्यांत स‌‌र्वात कमी ६३९ रुग्ण राजस्थानात आढळले.

> गुजरातमध्ये संसर्ग वाढल्याने अहमदाबाद-सुरतनंतर गांधीनगरमध्ये रविवारपासून लॉकडाऊन कडक होईल.

निमलष्कराच्या ११४ जवानांना संसर्ग, संख्या ६५० वर

शनिवारी निमलष्करी दलाचे आणखी ११४ जवान बाधित आढळले. पाचही निमलष्करी दलातील एकूण ६५० जवान बाधित झालेत. शनिवारी सीआरपीएफचे सर्वाधिक ६२ जवान बाधित आढळले. तर, आयटीबीपीचे सहा, बीएसएफचे ३५, सीआयएसएफचे १३ आणि एसएसबीचे १८ जवानही बाधित आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here