
मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे सटाने ग्रामपंचायत चे सदस्य बाजीराव शंकर मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. बाजीराव मोरे हे कुंभार समाजाचे नांदगाव तालुका अध्यक्ष आहेत. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत पक्षात स्वागत केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे नांदगाव तालुका प्रमुख साईनाथ भाऊ गिडगे मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे लोकेश साबळे ऋषिकांत आव्हाड सतीश भुरे आदींचे शिवसैनिक उपस्थित होते,
