अहिल्यानगर” जिल्हा नामांतर लढ्याचे रणशिंग शेवगाव येथून फुंकले,आक्रमक होत तहसीलदारांना घेराव

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) “अहिल्यानगर”हे अहमदनगर जिल्ह्याला नाव द्यावे या साठीच्या नामांतर लढ्याचे रणशिंग शेवगाव येथून फुंकण्यात आले असुन तालुक्यातील जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे,विनायक नजनसर,कानिफ कर्डीले, गणेश कोरडे,बाबा सावळकर,भगवान जर्हाड या प्रमुख कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार मयुर बेरड यांना दारातच घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी करीत लवकरात लवकर “अहिल्यादेवीनगर” नामांतराची घोषणा व्हावी यासाठीचे निवेदन दिले.प्रचंड घोषणा बाजीमुळे शेवगाव तहसील कार्यालय दणाणून गेले होते. नामांतर लढ्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवीच्या संपूर्ण देशातील कार्याची ओळख करून देत आक्रमक भूमिका घेत नामांतराठीचे आपले विचार व्यक्त केले. प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवीचे जन्मगाव “चौंडी” येथुन या नामांतर लढ्याची सुरुवात होणार आहे.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख समन्वयकांच्या बैठका घेन्यात येणार आहे. आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण अहमदनगर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरून धनगरी पारंपरिक वेशात नाद- गजरात वाजत गाजत जाउन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात काही माता भगिनींच्या हस्ते संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावा सह जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी “अहिल्यानगर” नामांतर व्हावे यासाठीचे आपल्या ग्रामपंचायतीच्या पाठींब्याचे ठराव प्रत्येक तालुक्यातून स्थापन केलेल्या प्रमुख समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांकडे जमा करावेत असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा नामांतर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शेवगाव येथील तहसील दालनातील आंदोलनात अशोक गाढे,मच्छिंद्र कोरडे,महेश मारकळ,धर्मराज तागड,ज्ञानदेव वीर,राहुल कर्डिले, साईनाथ कर्डीले, श्रीकांत जवादे,घुगेसर, सोमनाथ वीर,भाउसाहेब कोल्हे,गहिनीनाथ गुंजाळ, भागवत शिंगाडे,महेश मिसाळ, दिपक शिंदे,सुनिल दातिर, अक्षय भाकरे,महेश भाकरे,महेश शिंदे,सुनिल कळकुटे,ज्ञानेश्वर कळकुटे, अरुण मतकर, नवनाथ तागड,मंखळ पांढरे,बाजीराव लेंडाळ यांचा समावेश होता. (प्रतिनिधी – सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here