एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’

0

केरळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या लोकसभेच्या प्रवासादरम्यान भीमावरम,आंध्र प्रदेश येथे केंद्रीय राज्यमंत्री मा.व्ही. मुरलीधरनजी,मा.शिव प्रकाशजी,मा. सुनील देवधर जी,मा.प्रदेश अध्यक्ष सोमू विराराजू व भारतीय जनता पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांसमवेत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली तसेच बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना व समिती सदस्यांना भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारले असून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या ध्येयाबद्दल माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here