मनमाड : मनमाड शहर महाशिवरात्र उत्सव समितीची सालाबाद प्रमाणे गांधी चौक येथे मुंजाबा मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी महाशिवरात्रीच्या उत्सवा निमित्त साधक-बाधक चर्चा झाली. यावेळेस 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळेस महाशिवरात्र उत्सव समितीचे जेष्ठ सदस्य दिलीप भाऊ नरवडे व नगरसेवक कैलास भाऊ गवळी यांनी लावणी आणि तमाशा ही परंपरा कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मांडला या ठरावास संपूर्ण महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने एक मुखी पाठिंबा देऊन तो पास केला तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी शहरातील सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम रामगुळा आणि पांझण नदीच्या तीरावर असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सालाबादप्रमाणे कुस्त्यांची विराट दंगल ही सुद्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने वेशीतील शिव मंदिर येथे पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बोरिंग करणे तसेच एकात्मता चौक येथे भव्य शिव देखावा सुद्धा करण्यात येणार असून याचबरोबर शिव मंदिरामध्ये तांब्याची घागर लावण्याचा निर्णय घेण्यात आला याचबरोबर पारंपारिकरित्याने काढण्यात येणाऱ्या कावडी तक्रार उत्सवही मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आला
महाशिवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बबन आव्हाड यांची निवड करण्यात आली
कार्याध्यक्ष राजेंद्र करकाळे,उपाध्यक्ष दत्ता बारसे ,श्रीकांत बहोत, मयूर ओचाणी ,अकबर सोना वाला शैलेश सोनवणे,सुनील ईस्ते ,सचिव,अनिलंदादा देवरे,योगेश बच्छाव,खजिनदार, हेमंत बोडके,लक्ष्मण हरबा, ईश्वर पाटील, प्रमुख मागदर्शक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,मयूर बोरसे माधव शेलार दिनेश केकान, सलीम भाई सोनावाला गोविंद रसाळ ,भाऊ हरबा सुभाष माळवतकर ,अशोक सानप ,भागीरथ सोनार, राजाभाऊ अहिरे,मोझेस साळवे लाला नागरे,शरद बहोत, रवी इप्पर, राजाभाऊ भाबड,पर्रीख बाबूजी,ललित रसाळ सन्नी फसाटे,गंगा पहेलवान करकाळे,मोहन पहेलवान, सागर केदारे, धनंजय आवचारे,बापू वाघ,दतु आणा ,थोरात,रमेश बारसे, जानेशवर नागापुरे आधी बैठकीसाठी उपस्थित होते, सदर बैठकीचे नियोजन व प्रास्ताविक आझाद आव्हाड यांनी केले,
Home Breaking News मनमाड महाशिवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी बबन आव्हाड यांची निवड लावणी आणि तमाशा...